पहा, 'दर्या' कादंबरीचा अफलातून टिझर
 महा एमटीबी  25-Nov-2017

 
 
सध्या एखाद्या चित्रपटाचा, मालिकेचा किंवा अगदी नाटकाचाही टिझर बघण्याची रसिकांना सवय झाली आहे. किंबहुना ते अंगवळणीच पडलं आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने साहित्य क्षेत्रातही ही ट्रिक वापरण्याचा निर्णय घेतला असावा. क्षितिजने निर्मित केलेल्या 'दर्या' या मराठी व इंग्रजी कादंबरीचा टिझर आज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे व त्याला अल्पावधीतच प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

समुद्रातील मासेमारी, मानवी जीवन, ईर्षा या सगळ्या गोष्टींवर लेखक विक्रम पटवर्धन याने 'दर्या' मधून भाष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. विक्रमच्या लिखाणाला आमिरखान पठाण याने अतिशय समर्पक अशी चित्र ग्राफिकच्या माध्यमातून रेखाटली आहेत आणि हि चित्र देखील 'दर्या'चे एक प्रमुख आकर्षण आहे. 'माणसातील मायेचा दर्या तू सांभाळ', टिझर मधल्या या संवादात या कादंबरीचे सार आहे की काय असे वाटते. 
 
Embeded Object
'दर्या'च्या टीझरसाठी ट्रॉय-अरिफने बॅकग्राऊंड स्कोर दिलेले आहेत तसेच नीना कुलकर्णी यांच्या आवाजातील संवादांमुळे हा टिझर अधिकच प्रभावी बनला आहे. ही कादंबरी प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्याची बुकगंगा वरून नोंदणी सुरु झाली आहे. रितेश देशमुख, अमेय वाघ, अमृता फडणवीस यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावरून 'दर्या'चे प्रमोशन सुरु केले आहे. 
 
Embeded Object
 
Embeded Object