न्यूटन चित्रपटाला मिळाले २ आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कार
 महा एमटीबी  23-Nov-2017 

बॉलीवूडमधल्या न्यूटन सिनेमाने भारताबाहेर जागतिक स्तरावर मोठे यश कमाविले आहे. आशियातील ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारात २०१७ सालात २ पारितोषिक पटकावणारा तो एकमेव भारतीय सिनेमा ठरला आहे.

 

न्यूटनमधील अभिनयासाठी राजकुमार राव याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून यात पारितोषिक दिले गेले. त्याचबरोबर मयंक तिवारी आणि अमित मासुरकर यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा पारितोषिक मिळाले आहे. यामुळे टीम न्यूटन सहित भारतीय चित्रपट सृष्टीत मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.

 

या पुरस्कारामुळे न्यूटन सिनेमाचा ऑस्करसाठी प्रवेश खुला झाल्याची चर्चा आहे. अभिनेता राजकुमार राव याने यावर ट्वीट केले आहे. त्यात राजकुमार म्हणतो की, आशियात प्रतिष्ठित असलेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून माझी निवड झाली आहे. धन्यवाद आई, आणि टीम न्यूटन. आपल्या स्वप्नांचा ओअथलग करणे थांबवू नका, असे देखील त्याने लिहिले आहे.

Embeded Object