इफ्फी महोत्सवात आज बाहुबलीची खास मेजवानी
 महा एमटीबी  23-Nov-2017

 

गोवा: ४८ व्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात इफ्फीमध्ये आज प्रसिद्ध चित्रपट बाहुबली दाखवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ८.३० वाजता हा चित्रपट दाखविला जाणार आहे. हा चित्रपट तेलगु या भाषेत दाखविला जाणार असून हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग असल्याचे म्हटले जात आहे.

 

 Embeded Object

 

भारतात अतिशय गाजलेला चित्रपट आणि ज्याने कित्येक दिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले असा हा चित्रपट असल्याने या महोत्सवात हा चित्रपट दाखविला जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रण आणि छायाचित्र अनुभवण्यासाठी खास परदेशी प्रेक्षक वर्ग देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.

 

भारतात या चित्रपटाला उत्तम पसंती आणि दाद देण्यात आली मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट किती प्रेक्षकांना आवडतो हे या महोत्सवातून कळणार आहे. या महोत्सवात हिंदी, तमिळ, मराठी, कन्नड, बंगाली अशा विविध भारतीय तसेच विदेशी भाषेतील चित्रपट देखील दाखविले जाणार आहे.