संधिसाधू मंदिरभेटी...
 महा एमटीबी  19-Nov-2017
विजय चौथाईवाले
राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांत गुजरातमधील 11 हिंदू मंदिरांना भेट दिली, पण एकदा का निवडणूक संपली की काँग्रेस पक्ष पुन्हा आपल्या जुन्या अजेंड्याकडेच परतणार, हे नक्की!
एका अहवालानुसार, राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांत गुजरातमधील 11 हिंदू मंदिरांना भेटी दिल्या आहेत. खरंतर खुद्द राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि पिताश्री राजीव गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या मंदिरांना भेटी दिल्या असतील, त्यापेक्षी नक्कीच हा आकडा जास्तच आहे.
 
बहुसं‘य धार्मिक लोक- ज्यांचा दैवी शक्तीवर विश्वास असतो- ते दररोज आपल्या आराध्य दैवताची पूजा-प्रार्थना करतात, पण तरीही ते दररोज मंदिरामध्ये जातीलच असे नाही. हे झाले एक प्रकारचे लोक. दुसरा प्रकार म्हणजे, असे लोक- ज्यांना देवाची आठवण केवळ ते संकटात असतात तेव्हाच येते आणि इतर वेळी देवाचे साधे नामस्मरण करणेही त्यांच्या ध्यानीमनी नसते. राहुल गांधी हे याच दुसर्‍या प्रकारातील लोकांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हवे; अन्यथा एकाच दिवशी पाच मंदिरांना भेटी देण्याच्या त्यांच्या कृतीचा वेगळा कोणता अर्थ निघू शकतो? ही मंदिरांना भेटी देण्याची तीर्थयात्रा राहुल गांधी यांच्यासाठी नक्कीच एक चांगला फोटो-शूटिंगचा इव्हेंट असू शकतो, पण यामुळे ते देशातील जनतेला कधीही मूर्ख बनवू शकत नाहीत. प्रत्येक जण या मंदिरभेटीकडे केवळ एक पॉलिटिकल स्टंट म्हणूनच पाहतो आहे, याबाबत कुणाचेही दुमत असू शकत नाही.
 
2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गांधीनगरमधील प्रसिद्ध अक्षरधाममंदिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. सोनिया गांधी त्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. पण, दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यांना अक्षरधाममंदिराला भेट द्यावीशी वाटली नाही. संपुआ सरकारच्या काळात, माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी, हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद यांसार‘या संकल्पनांचा शोध लावला! अलीकडेच हिंदू/भगवा दहशतवाद ही भ‘ामक संकल्पना मांडण्याची त्यांची जुनीच वृत्ती उफाळून आल्याचे सर्वांनी पाहिले. राजकोटमध्ये तर त्यांनी काश्मीरला आझादी (स्वायत्ततेशी तुलना करून) देण्याचा एक काल्पनिक मुद्दा मांडला. ज्यामुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या वर्षी दिल्या गेलेल्या ‘भारत की बरबादी’ या घोषणेला त्यांनी उभारी दिली.
 
एकीकडे राहुल गांधी गुजरातमधील मंदिरात फेरफटका मारत असताना दुसरीकडे काय चित्र दिसते? तर वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे अयोध्येत राममंदिर उभारणीला विरोध करणार्‍या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा, सर्वोच्च न्यायालयात खटला लढत आहेत. सिब्बल ही तीच व्यक्ती आहे, जे सर्वोच्च न्यायालयात, मुस्लिम महिलांना अन्यायकारक आणि भयानक वागणूक देणार्‍या तिहेरी तलाक प्रथेच्या समर्थनार्थ ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाची बाजू मांडत आहेत (या ठिकाणी हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, काँग्रेसने कधीही या महिलाविरोधी प्रथेला विरोध केलेला नाही). कपिल सिब्बल हे आर्थिक अपहाराचा आरोप असलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेविरोधातही त्यांचा बचाव करत फिरत आहेत.
 
केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे, तर संस्थात्मक पातळीवरही काँग‘ेसची कृती यापेक्षा काही वेगळी नाही. संपुआ सरकारच्याच काळात, सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सल्लागार परिषद (एनएसी) म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुपर सरकारने कुप्रसिद्ध सांप्रदायिक हिंसा विधेयकाचा मसुदा तयार केला, ज्यात दंगलींसाठी नेहमीच बहुसं‘य समाजाला (वाचा ः हिंदू) जबाबदार धरले आहे. संपुआने आणलेल्या या विधेयकाला प्रचंड मोठा विरोध झाल्याने त्यांनी नंतर ते विधेयक मागे घेतले.
संपुआ सरकारच्या काळातच रामसेतूप्रकरणी रामकृष्णन् यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले की, राम एक ऐतिहासिक व्यक्ती नसून केवळ काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. काही महिन्यांपूर्वीच केरळमधील काँग‘ेस कार्यकर्त्यांनी खुलेआम सर्वांसमोर भररस्त्यात गायीची हत्या केली आणि त्याचे चित्रण सोशल मीडियावर मोठ्या अभिमानाने अपलोड केले.
 
वरील सर्व कृत्ये ही काही कधीतरी अपवादानेच घडणारी नाहीत, तर तो एका विचार-विवेचनाचा धोरणात्मक भाग आहे. हे सर्व केवळ अल्पसं‘य समाजाची मतपेटी आपल्या झोळीत भरून घेण्यासाठीच होते असे नाही, तर त्यामागे अल्पसं‘य समाजाचे लांगूलचालन करण्याची ही योजना असल्याचे यातून स्पष्ट होते. या धोरणाचा दुसरा भाग म्हणजे, हिंदू समाज, धर्माशी संबंधित सर्वच गोष्टींवर आक्षेप घेणे आणि हिंदुंविरोधातील सर्व गोष्टींना दुजोरा देणे, हा आहे. यातून या लोकांना संपूर्ण हिंदूंबद्दलच अ‍ॅलर्जी असल्याचे स्पष्ट होते. नुकतीच कर्नाटकात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली. यामागे नेमके कोणते प्रयोजन होते, हे कुणी सांगू शकेल का? ही एक विचारप्रकि‘या आहे, ज्यामुळे काँग्रेस हिंदू समाजाबाबत कधीही सहानुभूतिपूर्वक विचार करू शकत नाही.
 
आता नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली असून, राहुल गांधींच्या प्रचारव्यवस्थापकांनी खात्री केली की, ते गुजरात निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कोणत्याही मुस्लिम किंवा ख्रिश्चन प्रार्थनास्थळांना भेट देणार नाहीत. त्यांनी जाळीदार मुस्लिमटोपी घालून एकही सेल्फी किंवा फोटो काढला नाही (स्वत: अशी एखादी टोपी घालणे तर मग दूरचीच गोष्ट!) आपल्या भाषणात त्यांनी एकदाही अल्पसं‘य समाजाच्या बाजूने ब‘देखील काढला नाही किंवा गोध्रा दुर्घटनेनंतरच्या दंगलीचा उल्लेख केला नाही वा मौत का सौदागर किंवा त्यासारखे काही शब्द उच्चारले नाहीत.
 
सर्वसामान्य लोक काही इतकेही खुळे नाहीत की, त्यांना राहुल गांधींच्या धार्मिक पर्यटनामागचा उद्देश समजू शकणार नाही. प्रत्येकाला माहिती आहे, हे सगळे प्रकार डिसेंबरच्या सूर्यास्तानंतर म्हणजेच गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर थांबणार आहेत. त्यानंतर काँग्रेस पक्ष त्याच्या मूळ अजेंड्यावर, जो की डाव्या-उदारमतवादी लोकांमुळे प्रभावित झाला आहे, जो राहुल गांधी, पी. चिदम्बरम् आणि कपिल सिब्बल यांना प्रेरक ठरला, त्यावरच परतणार आहे. गुजरातमधील कोणत्याही व्यक्तीला याबद्दल कसलीही शंका नाही, हे नक्की!