... या उत्तरामुळे मानुषी बनली 'विश्वसुंदरी'
 महा एमटीबी  19-Nov-2017

 

सान्या (चीन) : चीनमध्ये नुकताच पार पडलेल्या जागतिक विश्वसुंदरी २०१७ या स्पर्धेमध्ये मध्ये भारताच्या मानुषी छिल्लर हिने विजेतेपद पटकावून तब्बल १७ वर्षानंतर भारताला विश्वसुंदरीचा किताब मिळवून दिला आहे. मानुषीच्या या यशाबद्द्ल सध्या देशभरात तिचे कौतुक केले जात आहे. परंतु या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तिला विचारण्यात आलेल्या एक प्रश्नाचे उत्तर देखील तिने अशा कौतुकास्पदरित्या दिलेले होते ज्यामुळे तिची विश्वसुंदरी स्पर्धेत अंतिम विजेती म्हणून निवड करण्यात आली.


विश्वसुंदरी स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात सर्व स्पर्धकांना त्यांचे बुद्धिकौशल्य, त्यांचे सामाजिक तसेच व्यक्तिगत भान या सर्वांची परीक्षा घेण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. त्यानुसार मानुषीला देखील स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला. स्पर्धेतील निवेदकांनी मानुषीला प्रश्न केला की, या जगात असा कोणता पेशा (प्रोफेशन) आहे, ज्याला सर्वात अधिक वेतन मिळायाला हवे? या प्रश्नावर मानुषीने दिलेल्या उत्तराने परीक्षकांसह सर्वच जण भारावून गेले.


या प्रश्नाच्या उत्तरादाखल मानुषी म्हणाली, "मी लहानपणापासून आपल्या आईच्या अगदी जवळ आहे. माझ्या आईने मला जीवनात नेहमी प्रेरणा दिली आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक कष्ट घेत असते, तसेच अनेक त्याग देखील करत असते. त्यामुळे जगात आई होणे हे सर्वात कठीण आहे. आणि आईच्या कष्टांचा मोबदला पैशात देता येत नाही. याच बरोबर एखाद्या व्यक्तीला फक्त पैसे देणे म्हणजे त्याचा मोबदला दिला असे होत नाही. तर एखाद्या व्यक्तीला प्रेम आणि आदर दिला तरी देखील त्याला त्याच्या कार्याचा योग्य मोबदला दिल्यासारखे होते. त्यामुळे जगातील आई या पेशाला प्रेम आणि आदराचा सर्वात अधिक मोबदला मिळला पाहिजे."

मानुषीने दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ -

Embeded Object