'इफ्फी'चा वाद अधिकच चिघळतोय... 
 महा एमटीबी  16-Nov-2017


 
गोव्यात २० नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवाचा ('इफ्फी') वाद अधिकच चिघळत चालला आहे. रवी जाधव यांच्या  'न्यूड' या चित्रपटाने 'इफ्फी'ची सुरुवात होणार होती परंतु केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपटच मोहोत्सवातून वगळला आहे. त्याचबरोबर 'सेक्सी दुर्गा' हा चित्रपटही वगळला गेला आहे. यानंतर मराठी चित्रसृष्टीलीत एक वर्ग 'इफ्फी'ला उपस्थित न राहण्याच्या पवित्र्यात आहे तर दुसरा वर्ग म्हणतोय की 'इफ्फी'ही आमच्या साठी मोठी संधी आहे ती आम्ही का नाकारावी?
 
योगेश सोमण यांच्या 'भिर भिर' या चित्रपटाचीही निवड 'इफ्फी'साठी झाली असून मला आणि माझ्या सारख्या पहिल्यांदा आशा महोत्सवात निवडलं गेलेल्यांना जायचंय आणि आम्ही जाणार अशी भूमिका त्यांनी काल घेतली होती. या भूमिकेवरूनही सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला. 

आज पुन्हा एकदा सोमण यांनी जाधवांच्या 'न्यूड' चित्रपटावर टीका करणारी एक मिश्किल पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. या पोस्टनंतर हे प्रकरण अधिक चिघळण्याची चिन्ह आहेत. या अशा गोष्टींमुळे मूळ प्रश्न बाजूला राहिला असून मराठी चित्रसृष्टीतील दोन वर्गातील वाद चव्हाट्यावर येत आहे. 

अभिनेता प्रसाद ओक याने प्रथम दिग्दर्शित केलेला 'कच्चा लिंबू' हा चित्रपटही 'इफ्फी'साठी निवडण्यात आला आहे. सध्या चालू असलेल्या सगळ्या गोष्टींमुळे प्रसाद ओक देखील 'इफ्फी'ला उपस्थित राहण्याबाबत संभ्रमात आहे, नक्की काय करावं सुचत नसल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये टाकले आहे. 

या संपूर्ण प्रकरणाबाबत अशोक राणे यांचीही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ती भूमिका आपण खालील पोस्ट मधून वाचू शकता.