धार्मिकता बाजूला ठेवत योगाला सौदी अरेबियात क्रीडा प्रकार म्हणून मान्यता
 महा एमटीबी  14-Nov-2017


 

योग केल्यामुळे आपली धर्मिकता भ्रष्ट होईल की नाही? अशी भारतीय मुस्लिमांमध्ये चर्चा असतानाच सौदी अरेबिया देशाने योगाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली आहे. धार्मिकतेचा मुद्दा बाजूला ठेवत आरोग्य अधिक महत्वाचे असल्याचा निर्वाळा यातून सौदी अरेबियाने दिला आहे.


याचे मुख्य श्रेय ३७ वर्षीय नौफी मारवाई या महिलेला जाते, ज्यांच्या प्रयत्नातून हे सध्या झाले आहे. नौफी मारवाई यांनी आपले संपूर्ण जीवन योग या विषयासाठी समर्पित केले आहे. त्या सौदीतील अनेक शाळांमध्ये योग विषयी विविध कार्यक्रम घेत असते. २०१५ सालापासून सौदी अरेबियात याला सरकारी मान्यता मिळावी म्हणून त्या प्रयत्नशील होत्या. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. १९९८ साली नौफी मारावाई यांना केरळमध्ये योगचारिणी या किताबाने नावाजले गेले होते.


सौदी सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आज त्याची अधिकृत घोषणा केली. त्यात नमूद केले आहे की, ज्यांना योग शिकायचे अथवा शिकवायचे आहे ते सरकारमान्य परवाना मिळवून अधिकृतपणे योग शिकू शकतात.