ऐश्वर्या देणार सलमान खानला टक्कर?
 महा एमटीबी  10-Nov-2017

 
सलमान खान उर्फ बोललीवूडच्या 'भाई' चा चित्रपट प्रदर्शित होणार म्हणालं की त्या शुक्रवारी तर सोडाच पण त्याच्या मागच्या आणि पुढच्या आठवड्यातही चित्रपट दिग्दर्शित करायला मोठे मोठे कलाकार-दिग्दर्शक, निर्माते मागे सरकतात. अशा परिस्थितीत चक्क ऐश्वर्या राय-बच्चन सलमान खानला टक्कर द्यायला मैदानात उतरलीये अशा आशयाची चर्चा सध्या जोर धरत आहे. 'रेस' या फ्रॅन्चायसी मधल्या 'रेस-३' च शूटिंग नुकताच सुरु झालं असून त्याची पोस्टही सलमानने आज सोशल मीडिया वर टाकली आहे. आणि साहजिकच त्याचा हा आगामी चित्रपट पुढच्या वर्षी 'ईद'च्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. पण दुसरीकडे ऐश्वर्या व अनिल कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘फन्ने खान’ हा चित्रपटही 'ईद-२०१८' लाच प्रदर्शित होत आहे. 
 
Embeded Object
 
प्रसिद्ध सिनेविश्लेषक तरन आदर्श यांनी ट्विटरवरून ‘फन्ने खान’ या चित्रपटाची कन्फर्म डेट प्रसिद्ध केली आहे. तसेच या चित्रपटातील प्रमुख अभिनेता अनिल कपूर यानेही चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत पोस्ट प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे ‘फन्ने खान’ या चित्रपटाचे चित्रीकरण बऱ्यापैकी पूर्ण झाले असून 'रेस-३' चे चित्रीकरण नुकतेच सुरु झाले आहे. तरीदेखील ऐश्वर्याचा हा चित्रपट सलमानच्या चित्रपटासोबत प्रदर्शित करण्याचा अट्टाहास निर्मात्यांचा का असावा यामागचे कारण समजू शकलेले नाही. 
 
Embeded Object
 
Embeded Object
 
रेस-३ मध्ये प्रथमच सलमान खान 'ग्रे' शेड ची व्यक्तिरेखा साकारत आहे. पहिल्या दोन्ही रहस्य आणि थरारपट म्हणून नावारूपाला आलेल्या पहिल्या दोन्ही रेस चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. रेस-३ मध्ये सलमान सोबत जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, डेजी शाह आदी कलाकार दिसतील. रेमो डिसूजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून रमेश तौरानी निर्माता आहेत. तर दुसरीकडे ‘फन्ने खान’  या चित्रपटाचे निर्माता भूषण कुमार आणि अर्जुन एन कपूर आहेत. 
 
Embeded Object
 
सलमान आणि ऐश्वर्याचे संबंध अजूनही त्यांचे चाहते विसरलेले नसून यानिमित्ताने पुन्हा एकदा जुन्या गोष्टींची चर्चा नक्कीच ऐरणीवर येणार. आता पुढील काही महिन्यात ‘फन्ने खान’ च्या निर्मात्यांचा हा निर्णय बदलतो की एक आव्हान म्हणून याकडे बघत सलमानला टक्कर देण्याकरीत हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतात हे बघणं खरोखरीच उत्सुकतेचं ठरणार आहे.