जेव्हा केंद्रीय मंत्र्यांनाही पाणीपुरी खायचा मोह आवरत नाही ...
 महा त भा  09-Oct-2017

 

बबिना (उत्तर प्रदेश): केंद्रीय जलसंपदा, नदी विकास मंत्री उमा भारती या आज उत्तर प्रदेशमधील बबिना रेल्वे स्थानकाचा दौरा करण्यासाठी गेल्या असताना त्या अचानक एका पाणीपुरी विकणाऱ्या दुकानाकडे गेल्या आणि पाणीपुरीची मागणी करून पाणीपुरी खाऊ लागल्या. हा प्रसंग पाहून आजूबाजूचे लोक देखील आश्चर्यचकित झाले.ो 

 

                             

 

पाणीपुरी ही अशी गोष्ट आहे की तिचा मोह केंद्रीय मंत्री उमा भारती यांना देखील आवरला गेला नाही असा अर्थ सांगणारी पोस्ट उमा भारती यांनी त्यांच्या फेसबुकवरून शेअर केली आहे. बबिना रेल्वे स्थानकावरील रामसिंग भाई यांच्या पाणीपुरीच्या दुकानात आज पाणीपुरी खावून माझे मन प्रसन्न झाले आहे अशा शब्दांमध्ये उमा भारती यांनी वर्णन केले आहे.

 

काही राजकीय व्यक्ती देखील सामान्य कुटुंबातून राजकारणात येतात मात्र प्रसिद्धी आणि राजकीय घडामोडींमुळे त्यांचे व्ययक्तिक आयुष्य देखील सार्वजनिक होवून जाते. मात्र या व्यस्त कामात देखील आपल्या आवडी जपायला हव्यात असा काहीसा संदेश उमा भारती यांनी आज दिला आहे.