आमीर म्हणतो ‘संयमाचं फळ गोड असतं’...
 महा त भा  09-Oct-2017

 

तुर्कस्तान : मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट सिक्रेट सुपरस्टारच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र स्वत:साठी तो नेहमीच वेळ बाजूला काढीत असतो व या वेळामध्ये तो जगातील वेगवेगळ्या बाबींचे निरीक्षण करीत असतो. असेच काहीसे गमतीदार निरीक्षण त्याच्या ध्यानात आले आणि त्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला.

 

Embeded Object

 

तुर्कस्तानमध्ये एका आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम द्यायची पद्धत कशी आहे याचा गमतीदार व्हिडिओ त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने ‘सब्र का फल मीठा होता है’ अशी ओळही लिहिली आहे. आमीर नेहमीच समाजाचे निरीक्षण करीत असतो. यापूर्वीही त्याने समाजाचे निरीक्षण करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. कधी भारतात असुरक्षित वाटते या त्याच्या व पत्नीच्या एकत्रित निरीक्षणामुळे तर कधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाच्या निरीक्षणामुळे आमीर नेहमीच चर्चेत असतो.

 

आपल्या हातात आईस्क्रीमचा कोन दिला जातो मात्र दुसऱ्या क्षणातच तो आपल्या हातून घेतला जातो आणि तेथेच सुरु होते आपल्या संयमाची परीक्षा, त्यामुळे जो शेवटपर्यंत या खेळात आपला संयम टिकवून ठेवेल त्यालाच गोड फळ खायला मिळेल असे आमीरने यावेळी सांगितले आहे. हीच म्हण आपल्या रोजच्या जीवनात देखील लागू पडते त्यामुळेच ही शिकवण देत असल्याचे आमीरने म्हटले आहे.