अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलेर यांना नोबेल पुरस्कार जाहीर
 महा त भा  09-Oct-2017


 

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एच. थॅलेर यांना २०१७ सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'वर्तणुकीशी अर्थशास्त्र' यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे रॉयल स्वीडिश अकादमीने जाहीर केले आहे.

Embeded Object

रिचर्ड यांनी मानसशास्त्र आणि अर्थशास्त्राचे संगम घडवून आणण्याचे मोठे कार्य केले आहे. मानवी विचारांचा अर्थशास्त्रावर परिणाम घडतो, या सिद्धांताची मांडणी त्यांनी केली आहे. अर्थशास्त्राची मांडणी करताना मानसशास्त्रीय गृहितकांच्या आधारावर ती केली जावी, यामुळे सामाजिक प्राधान्यक्रमाचा रेटा, तसेच वैयक्तिक विचार करण्याची पध्दती थेट बाजारावर परिणामकारक ठरते. अशी मांडणी रिचर्ड थॅलेर यांनी केली आहे.


रिचर्ड एच. थॅलेर अल्पपरिचय

रिचर्ड एच. थॅलेर हे अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांचा मानसशास्त्राचा अर्थशास्त्रावर होणाऱ्या परिणामावर मोठा अभ्यास आहे. 'नज' नावाच्या बेस्ट सेलर पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. ज्यात त्यांनी वर्तणुकीशी अर्थशास्त्राबाबत विस्तृतपणे लिहिले आहे. शोकागो विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ७२ वर्षीय रिचर्ड मुळचे अमेरिकी नागरिक असून, १९९५ साल पासून शिकागो विद्यापीठात कार्यरत आहेत.

Embeded Object