असा असेल 'अलाउद्दीन खिलजी'
 महा त भा  03-Oct-2017मुंबई : संजय लीला भन्साळी याच्या बहुचर्चित 'पद्मावती' या चित्रपटातील राणी पद्मावती, महारवाल रतन सिंग यांच्या नंतर आता चित्रपटाचा खलनायक असलेला अलाउद्दीन खिलजी देखील आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पद्मावती या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या रणवीर सिंग याने नुकताच चित्रपटातील आपला फर्स्ट लुक आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. रणवीरच्या या नवीन लुकला त्याच्या चाहत्यांकडून देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे.


रणवीर सिंगने चित्रपटातील आपल्या फर्स्ट लुकचे दोन पोस्टर्स आपल्या सोशल मिडीयवर शेअर केले आहेत. यामध्ये तो दिल्लीचा बादशाह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसून येत आहे. रणवीरचा हा लुक अत्यंत वेगळा आणि भयानक असा दिसत आहे. चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये खिलजी आरश्यामध्ये पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये डोक्यावर सुलतानी पगडी, डोळ्यात काजळ आणि डोळ्याखाली एक जखम अशा लुकमध्ये रणवीर दिसून येत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये देखील रणवीरचा लुक अत्यंत वेगळा असा दिसून येत आहे.

Embeded Object

Embeded Object


रणवीरच्या या नव्या लुकला त्याच्या चाहत्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. रणवीरने पोस्टर शेअर केल्यानंतर अल्पावधीत ते सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरूनच रणवीरने खिलजीच्या आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला असणार असे दिसून येत आहे.


प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती' हा चित्रपट अनेकवेळा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोन, शहीद कपूर आणि रणवीर सिंग हे मुख्य भूमिकेत दिसून येणार असून या अगोदरच दीपिका आणि शहीदचा या चित्रपटातील फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. दीपिका आणि शहीदचा लुकला देखील चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.