शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : व्हॉट्स राँग?
 महा त भा  03-Oct-2017खूप अस्वस्थता, अचानक रडायला येणं, एका क्षणी जरा बरं वाटता पुढल्या क्षणी पुन्हा अगदी गळून गेल्या सारखं वाटणं.. काहीच करायची इच्छा न होणं... ही सगळी लक्षणं आहेत मानसिक आजाराची. हा आजार कुणालाही होवू शकतो, अगदी शारीरिक आजारासारखाच. मात्र याचे परिणाम खूप भीषण असतात, या आजाराचा शेवट आत्महत्येत देखील होवू शकतो. अशाच मानसिक आजाराविषयी जागरुकता पसरविणारा हा लघुपट आहे.

यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकरची मुलगी श्रिया पिळगांवकर हिने मुख्य भूमिका निभावली आहे. एक मुलगी, आपल्या करिएर मध्ये अत्यंत यशस्वी. तिने मिळवलेला एक प्रोजेक्ट यशस्वी होतो, ती तयार होवून ऑफिसला निघालेली असते, तिला आंदाची बातमी देण्यासाठी फोनही येतो, मात्र तिला आनंद होत नाही, ती अचानकच घरी थांबायचा निर्णय घेते. फोन उचलत नाही, अस्वस्थ असते, तिला या सगळ्याचा प्रचंड त्रास होत असतो, पण नेमकं काय होतंय ते कळत नसतं.

Embeded Objectआसरा फाउंडेशनच्या साथीने स्कडूश फिल्म्स ने या लघुपटाचा निर्माण केला आहे. एका अत्यंत महत्वाच्या विषयावर यामध्ये भाष्य करण्यात आले आहे. डिप्रेशन किंवा मानसिक आजाविषयी आजही आपल्या देशात खुलुन चर्चा करण्यात येत नाही. आजच्या तरुण पिढीमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यामुळे अशा पद्धतीच्या लघुपटांमुळे याविषयी जागरुकता होते. यूट्यूबवर या लघुपटाला ४ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकदा तरी हा लघुपट नक्कीच बघावा.