Video : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा पोल डान्स!
 महा त भा  03-Oct-2017

 
बॉलीवूड मधल्या अभिनेत्रींमुळे 'पोल डान्स' ही बाब आता नवी राहिली नाही. बऱ्याच हिंदी अभिनेत्री अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांचा सोशल मीडिया वरून पोस्ट करत असतात. पण मराठी चित्रपट सृष्टीत खूप कमी वेळा एखाद्या अभिनेत्रीने केलेला 'पोल डान्स'चा प्रयत्न आपल्याला बघायला मिळेल. मराठी  चित्रपट, मालिका आणि आता हिंदीमधील लाफ्टर शो मधून नाव मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने काल 'पोल डान्स' करतानाच व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 
 
Embeded Object
 
याआधीही तिनी दोन-तीन वेळा असा व्हिडिओ टाकला होता, पण त्यावेळी ती 'पोल डान्स' या प्रकारात नवखी असल्याचे स्पष्ट जाणवत होते. कालच्या व्हिडिओ मधून मात्र ती 'पोल डान्स' मध्ये आता माहीर झाली आसल्याचे लक्षात येत आहे. ''पोल डान्स हा एकप्रकारचा व्यायामच असून त्यामुळे रिफ्रेशमेंट मिळते असं नेहाने व्हिडिओच्या खाली कंमेंट करताना लिहिलं आहे.