असीनच्या घरी 'कन्यारत्न'
 महा एमटीबी  25-Oct-2017मुंबई : प्रसिद्ध दाक्षिण्यात्य अभिनेत्री असीन आणि मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. असीनचे पती राहुल शर्मा यांनी स्वतः या विषयी माहिती दिली आहे.


काल रात्री असीनने आपल्या बाळाला जन्म दिला आहे. राहुल यांनी या विषयी माहिती देताना 'असीन आणि मला एका सुंदर परीची प्राप्ती झाली आहे.' असे म्हटले आहे. तसेच सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी सर्वाचे आभार देखील त्यांनी मानले आहे. तसेच असीनने देखील आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून या विषयी माहिती दिली आहे. गेली नऊ महिने आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंददायी गेल्याचे दोघांनीही म्हटले आहे.

Embeded Object 

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने देखील असीन आणि राहुल यांच्या बाळाच्या जन्मावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच या गोड कन्यारत्नाच्या प्राप्तीसाठी दोघांचे अभिनंदन केले आहे.

Embeded Object


गेल्या वर्षी असीन आणि राहुल यांचा विवाह पार पडला होता. ख्रिस्ती आणि हिंदू पद्धतीनुसार त्यांचा विवाह पार पडला होता. त्यानंतर असीन कोणत्याही चित्रपटामध्ये झळकळी नव्हती. गेल्या वर्षभरापासून ती सिनेजगतापासून दूर होती. तसेच तिच्या गर्भधारणेविषयी देखील अनेकांना माहिती नव्हते.