कपिल शर्मा येणार आता नव्या अंदाजमध्ये
 महा एमटीबी  13-Oct-2017

 

मुंबई: हास्यसम्राट कपिल शर्मा पुन्हा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. कपिलचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’चे नुकतेच मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये कपिल पोलिसांच्या वेशात दाखवण्यात आला आहे. मनोरंजक आणि प्रेक्षकांना हसविणारा पोलीस अशा काहीशा भूमिकेत कपिल या चित्रपटात असेल असा काहीसा अंदाज हे मोशन पोस्टर पाहून लावता येईल.

 

Embeded Object

 

प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कलाकार म्हणून कपिल नेहमीच ओळखला जातो. कपिलचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. त्याचा पहिला चित्रपट काहीसा चालला नसला तरी देखील या चित्रपटाच्या माध्यमातून कपिल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कपिल शर्मा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजक करत आला आहे.

 

या चित्रपटात कपिल शर्मा याच्यासोबत अभिनेत्री इशिता दत्ता ही देखील प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव धिंग्रा हे आहेत. त्यामुळे आता या चित्रपटात कपिल प्रेक्षकांचे किती मनोरंजन करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ाणीयाचेता दी णी  नदी  स्वच्छ