‘शादी मैं जरूर आना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
 महा त भा  10-Oct-2017

 

‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘क्वीन’ आणि ‘बेहन होगी तेरी’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता राजकुमार राव आता एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहे. ‘शादी मैं जरूर आना’ या चित्रपटासह तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज झाला आहे. याच चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. राजकुमारने स्वत: हा ट्रेलर सोशल मिडीयावर टाकून आपल्यापर्यंत पोहोचविला आहे.

 

 Embeded Object

 

मागील चित्रपटात राजकुमार राव यांच्या ज्या प्रकारच्या साधारण भूमिका आहे त्याच प्रकारची काहीशी भूमिका या चित्रपटात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र या चित्रपटाची कथा काही वेगळीच असल्याचे ट्रेलर पाहून दिसून येत आहे. लग्नाच्या दिवशीच नवरी अचानक बेपत्ता होणे आणि काही महिन्यांनी ती पुढे येणे आणि मग हा चित्रपट पुढे सरकतो असे काहीसे या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.

 

मात्र, सध्या राजकुमार राव याचा चाहता वर्ग जोमाने वाढत जात असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट देखील फुल ऑफ मनोरंजन असेल असे म्हणण्यास काहीही हरकत नाही. हा चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता राजकुमारच्या या नव्या चित्रपटाची वाट त्याचे चाहते आतुरतेने बघत आहे.