"मुगडाळ उत्तप्पा विथ होममेड पनीर मसाला"
 महा MTB  19-Jan-2017


"मुगडाळ उत्तप्पा विथ पनीर मसाला"

 

साहित्य

दोन कप मुग डाळ
(आवडत असेल तर बाजारात छिलका मुग डाळ म्हणून एक प्रकार मिळतो तो आणा ,
प्रोटीन्स सोबतच भरपूर फायबर्स सुद्धा आयेतच मिळतात आपल्याला, मी हेच घेतले होते )
१ चमचा मीठ
दीड चमचा दाणेदार साखर
पाच चमचे लिंबू रस
दीड चमचा धने पावडर
दीड चमचा जिरं पावडरपांढरे तीळ अर्धा चमचा हिंग चिमुटभर
१ चमचा जिरं ४ चमचे हिरवीगार फ्रेश बारीक कापलेली कोथिंबीरएक चमचा कसुरी मेथी (किंचित कडवट चव छान लागते, आवडत नसल्यास वापरली नाही तरी चालेल)२ चमचे साजूक तूप (तुपावर केल्यास भन्नाट लागते)कांदा एक
बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या दोन आलं छान सातारी एक इंच तुकडा कडीपत्ता दोन चमचे

आधीची तयारी

मुगडाळ रात्रभर भिजवून ठेवा. शक्यतो रात्री उशिरा भिजवा म्हणजे सकाळी सकाळी ही डिश करता येईल. सकाळी या भिजलेल्या डाळीत मस्त हिरव्या चुटूक मिरच्या घाला , एक चमचा जिरं घाला, थोडंस आलं घाला , किंचित हिंग घाला , कच्चाच कांदा घाला, एक चमचा कडीपत्ता घाला, कोथिंबीर घाला, चवीपुरते मीठ घाला आणि आता मिक्सरच्या भांड्यात घालून याची उत्तपा घालता येईल इतपत छान पेस्ट तयार करा.  जास्त घट्ट नको आणि जास्त पात्तळ ही नको बरं.

कृती

 


आता एका बाजूला पनीर मसाला तयार करूया

एका तव्यावर साजूक तूप घालून त्यात तूप जरासे तापल्यावर आता आधी एक चमचा कडीपत्ता घालून किंचित परत आता यात बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि आलं घालून छान गुलाबी होईस्तोवर कांदा परता आणि आता परतल्यावर आता यात पांढरे तीळ घालून खरपूस भाजून घ्या. चवीपुरते मीठ घाला आणि साखरेचे थोडेसे दाणे घाला. आता यात हाताने क्रश केलेले पनीर घालून वर धने, जिरं पूड घालून मस्त हळुवार परता , आता हे झाल्यावर यात कसुरी मेथी टाका आणि व्यवस्थित परता, खाली लागणार नाही याची काळजी घ्या. यावेळी इथे हात किंचित ओला करून त्या ओल्या हाताच्या पाण्याचा अलगद किंचित हबकारा या तयार होत असलेल्या डिश वर मारा, पनीर मसाला मस्त तयार होतो यामुळे.....

हे सगळ करताना अग्नी बऱ्यापैकी मंद ठेवा म्हणजे पनीर छान खरपूस भाजून निघते आणि छान लागते. आता यावर लिंबू रस पसरून टाका. आता हा तयार झालेला मसाला मंद विस्तवावर ठेवून द्या. अथवा विस्तव बंद करून झाकण घालून तसाच ठेवून द्या.

मला माहितीये आत्तापर्यंत घरच्यांना भूक लागली आहे बट कांट हेल्प, उत्तप्पा व्हायचा आहे न अजून मित्रांनो आणि मैत्रिणींनो.......

आता शेजारच्या gasvar उत्तप्पा घालूया.

तव्यावर किंचित तेल पसरून तवा तापल्यावर त्यावर उत्तप्याचे जे पीठ आपण तयार केले आहे ते मध्यभागी घाला आणि गोलाकार फिरवत एकसमान पीठ पसरून घ्या. मुग जरासे चिकट असल्याने वरून परत सारखे करावे लागणार नाही अश्या हलक्या हाताने पीठ तव्यावर पसरा म्हणजे काढताना हळुवार निघतील. आता यावर कढइचे झाकण झाकून ठेवा आणि बाजूने किंचित वाफ बाहेर येताना दिसली रे दिसली कि झाकण काढून पहा आणि उत्तप्पा फिरवा.
आता फिरवलेला उत्तप्पा तयार होतो आहे. या सगळ्याचा भन्नाट वास घरादारात पसरला आहे . आता घराचे थांबणे शक्य नाही. आता सगळ्यांना मस्त हक मारा.
डायनिंग टेबलावर प्लेट्स मांडा , त्यात हा उत्तप्पा घाला आणि शेजारी पनीर मसाला ठेवा आणि आवडत असेल तर खोबर-कोथिंबीर-मिरची-जिरं चटणी सोबत करून घ्या, छान लागते ,

मी हीच घेतली होती.....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा...खुश व्हा...मस्त जगा

देव बरा करो.........