कोल्हापूरातही बाप्पाच्या विसर्जननाची धामधूम सुरू
 महा MTB  15-Sep-2016

कोल्हापुरात देखील आज सकाळपासून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरात सर्व गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले आहेत. तसचं या विसर्जन मिरवणूकीदरम्यान ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

यावेळी मानाच्या तुकाराम माळी गणपतीची मिरवणूक निघाली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणपती मंडळांना आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केल्याबाबत पालकमंत्र्यांनी कोल्हापुरकरांचे कौतुक केले आहे. तसेच गेल्या दहा दिवस जसे सहकार्य केले तसेच सहकार्य करा, प्रशासनाला कारवाई करण्याची वेळ येऊ देवू नका असे आवाहन पाटील यांनी केले आहे.