#ओवी Live- स्टार्ट अर्ली..
 महा MTB  24-Jul-2016

"का पण?", निलेश तावातावाने बोलत होता "So what if I am above 30?"

निलेशची चुलत बहिण, नीतू ओठ दाबून हसली. तिच्या teenager च्या दृष्टीने "above 30" म्हणजे प्रौढ कि काय म्हणतात ते होत. पण काही न बोलता  बाबाचा आणि निलेश दादाचा संवाद ऐकत होती.

"हवंच कशाला upper age limit? This is unfair!"  निलेश म्हणत होता.

दिनू काका निलेशची कैफियत ऐकून म्हणाला, "Civil Services मध्ये रुजू झाल्यावर बऱ्याच core values आत्मसात कराव्या लागतात. एका वयानंतर अशा गोष्टी जमत नाहीत. Military मध्ये तर हे वय २५ वर्ष आहे. Physical fitness, mental fitness, agility, grasping power, unlearn-learn-relearn capacity लहान वयात अधिक असते. शिवाय नवीन गोष्टी शिकून, आत्मसात करून, आचरणात आणायला ठराविक वेळ लागतो. तेवढा वेळ फक्त युवका कडे असतो. म्हणून upper age limit गरजेचे असते … "

नितूला परवाचा आजी बरोबर झालेला संवाद आठवला. आजीने तिला एक लहानसे पुस्तक दिले ‘ज्ञानेश्वरीतील १०८ ओव्या’, आणि म्हणाली, "हे वाचत जा अधून मधून."

"काहीतरीच बघ आजी तुझं! हे काय मी आत्ता वाचायचे का? वाचीन कधीतरी, maybe retire झाल्यावर वगैरे!" नीतू casually बोलली.

तेंव्हा आजी म्हणाली होती - "हं! म्हणजे बैल गेला अन झोपा केला!" 

"म्हणजे ग काय आजी?"

"अग, म्हातारपणात अंगात त्राण नसते. मन हळव होते. नाना व्याधी जडतात. केलेल्या, न केलेल्या गोष्टींचा पश्चाताप होतो. तेंव्हा का शिकणार, कसे जगायचे ते? उत्तम मुल्यांचा, ज्ञानाचा, आनंदाचा ठेवा तारुण्यातच बांधायाला हवा!"

आजी काल जे म्हणाली तेच बाबा आज दादाला सांगत होता! आजीचे शब्द नितूला आज नीटच कळले.   

ज्ञानेश्वर म्हणतात - ज्याला पुढे म्हातारपण येणार आहे, याचे स्मरण असेल, तो निश्चितपणे आत्ता पासून आत्मज्ञानाचे चिंतन करेल.

-दिपाली पाटवदकर