'साहो' मधील बहुप्रतीक्षित पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |



'साहो' या बिग बजेट ऍक्शन थ्रिलर चित्रपटामधील 'सायको सैया' हे बहुप्रतीक्षित पार्टी सॉंग आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा एक वेगळाच अवतार या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे गाणे एकाच वेळी हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.



गाणे प्रदर्शित झाल्याबरोबरच प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद या गाण्याला मिळत असून युट्युबवर आत्तापर्यंत या गाण्याला लाख ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. हे गाणे ध्वनी भानुशाली, तनिष्क बागची आणि सचेत टंडन यांनी गायले असून तनिष्क बागची यांनी या गाण्याचे शब्द आणि संगीत दिग्दर्शन दोन्हीही केले आहे.


'साहो' या चित्रपटात जॅकी श्रॉफ, निल नितीन मुकेश, व्हेंनेला किशोर,अर्जुन विजय, प्रकाश बेलावाडी, सुप्रिथ लाल, चंकी पांडे यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांची तगडी स्टारकास्ट तर आहेच पण आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याने देखील चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळवून देण्यास हातभार लावला आहे हे निश्चित.






माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@