खुशखबर : आता बेस्टचे किमान भाडे पाच रुपये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |


 


मुंबई : बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली भाडेकपात मंगळवार, दि. ९ जुलैपासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता बेस्टचे किमान भाडे केवळ पाच रुपये असणार आहे. भाडेकपात मंगळवारपासून लागू केली जाणार असून भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

 

बेस्ट परिवहन विभागाची आथिॅक कोंडी फोडत प्रवासी वाढण्यासाठी तिकीट दर कपातीला बेस्ट समितीनंतर पालिका सभागृहातही मंजुरी मिळाली आहे. आता आरटीए (रोड ट्रान्स्पोर्ट अँथॉरिटी)ची मंजुरी मिळाली असून राज्य सरकारने हिरवाकंदिल दिला आहे. त्यामुळे सोमवार रात्रीपासून नवीन दर कपात लागू होणार असून याचा लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. दरम्यान, तिकीट दर कपातीमुळे शेअर रिक्षा व टॅक्सीचे प्रवासी बेस्ट बसकडे वळणार, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 
 
बेस्टच्या इतिहासात भाडेवाढीचे अनेक प्रस्ताव आले. परंतु सरसकट भाडेकपातीचा हा ऐतिहासिक प्रस्ताव आहे. आता पाच किलोमीटरपर्यंत ५ रुपये, १० किलोमीटरपर्यंत १० रुपये १५ किलोमीटरपर्यंत १५ रुपये आणि १५ किलोमीटरपेक्षा पुढील अंतरासाठी २० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. हे भाडे साध्या, मर्यादित आणि जलद गाड्यांसाठी कायम राहणार आहे. वातानुकूलित गाड्यांसाठी याच अंतरासाठी , १३, १९ आणि २५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. 


बेस्टचे कमी करण्यात आलेले दर



० ते ५ किमी ५ रू


AC ६ रू



५ ते १० किमी १० रू.


AC १३ रू



१० ते १५ किमी १५ रू.


AC १९ रू.



१५ किमी वर २० रू.


AC २५ रू

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@