'रामायण' ३ डी मध्ये प्रदर्शित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |

 

लहानपणीपासून आपण रामायणाच्या कथा ऐकत आलो आहोत. याच कथांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी बॉलिवूडमध्ये बनवण्यात येणार आहे. नुकतीच याविषयीची घोषणा करण्यात आली. रामायण हा चित्रपट तीन भागांच्या  मालिकेत प्रदर्शित होणार असून पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटकर्त्यांनी जाहीर केली आहे. 


रामायण चित्रपटाचे दिग्दर्शन दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि मॉम या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी उद्यावर हे दोघे या तीन भागांच्या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. 'रामायण' हा चित्रपट ३ डी मध्ये प्रदर्शित होणारे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य असेल.  

चित्रपटातील कलाकार अजून जाहीर करण्यात आले नाहीत. मात्र या चित्रपटासाठी देशभरातील निवडक अभिनेत्यांना या चित्रपटामध्ये कास्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लू अरविंद, मधू मन्टेना  आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण' हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@