कंगना पुन्हा एकदा चर्चेत...कशामुळे?? जाणून घ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |


येत्या
२६ जुलैला कंगना राणावत आणि राजकुमार राव यांचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर चित्रपटकर्त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराची कंगना र्नावटची बाचाबाची झाली आणि नेहेमीप्रमाणे कंगना राणावत चर्चेत अली तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे.

 

व्हायरल भयानी या मनोरंजन क्षेत्रातील एका प्रसिद्ध पत्रकारांनी या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या विषयी सर्वत्र चर्चा सुरु झाली. पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना,"एका राष्ट्रवादावर आधारलेला चित्रपट करणे चुकीचे आहे का? मी असा चित्रपट करून चूक केली आहे का?" असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्यावर पत्रकाराने देखील प्रत्युत्तरादाखल काही वक्तवये केली आणि वाद आणखीनच चिघळला ज्यामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली.



 

कंगनाचे हे वागणे काही नवीन नाही. याआधी देखील अनेक वेळा तिच्या अशा विधानांमुळे ती चर्चेत राहिली आहे. सध्या तिची बहीण रंगोली देखील अशीच बेछूट विधाने करताना दिसून येत असल्यामुळे सगळ्याच चित्रपटसृष्टीत दोन्ही बहिणींविषयी चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळते. आता ही कुप्रसिद्धी आहे की आणखी काही हे ठरवणे अवघड आहे मात्र याचा परिणाम आता चित्रपटावर काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@