देवरांवर बरसले निरूपम : "राजीनामा आहे का दिल्लीत जायची शीडी"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019
Total Views |


 

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावर काँग्रेस नेते आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'हा राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी?' असा सवाल निरुपम यांनी विचारला आहे.

 

निरुपम म्हणतात, "राजीनाम्यात एक प्रकारच्या त्यागाची भावना अंतर्भूत असते. राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या क्षणी राष्ट्रीय पातळीवरचे पद मागितले जाते. हा राजीनामा आहे कि, वर चढण्याची शीडी ? कर्मठ लोकांनी पक्षातील अशाप्रकारच्या लोकांपासून सावध राहा." , अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

 

रविवारी कॉंग्रेसचे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरुपम यांच्या नेतृत्तवात मुंबई कॉंग्रेसमध्ये असलेली धूसफूस चव्हाट्य़ावर आली होती. मात्र, त्यानंतरही निरुपम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरायचे होते. अखेर उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या जागी देवरा मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले. मात्र, आता त्यांनीही राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याने मुंबई कॉंग्रेसला नवा चेहेरा कोण, असा प्रश्न पक्षासमोर आहे.

 

पदाचा राजीनामा देताना त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्ताव पक्षासमोर मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना मान्य केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@