मरियम थ्रेसियांची संत उपाधी..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2019   
Total Views |


 


 
संत मारिया गोरेट्टी यांनाही पोपने ‘संतत्व’ बहाल केले. कारण, 19व्या शतकाच्या सुरुवातीला 11 वर्षाच्या मारियावर अलसॅन्ड्रो नावाच्या 20 वर्षांच्या नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला. तिने निकराने विरोध करताच, अलसॅन्ड्रोने तिच्यावर चाकूने 14 वार केले. तिला इस्पितळात नेले जाते. तिच्या उशा पायथ्याशी फादर येशू दयाक्षमा शांतीची गाथा गातात. ती मरताना म्हणते,“अलसॅन्ड्रोला मी माफ केले. त्यालाही त्याच्या मृत्यूनंतर माझ्यासोबत स्वर्गात पाहायची इच्छा आहे.” इथे अलसॅन्ड्रोला कारावास होतो. पण पुढे सुटल्यावर त्याला पश्चात्ताप होतो. तो ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करतो. मारियाला त्यासाठी ‘संत’ उपाधी मिळते. 
 

फादर जोसेफ विथायाथिलने आपले निरीक्षण नोंदवले होते की, तीमेडिटेशनकरत असताना तिच्या शरीरावर पाच जखमा उमटल्या. त्या साक्षात आकाशाच्या बापाने येशूने दिल्या होत्या. हे तिने तिच्या दैनंदिन डायरीमध्येही लिहिले होते. हे तर काहीच नाही. ती सैतानांशी लढली होती. एकदा तर थ्रेसिया यांना आजूबाजूला नरकामध्ये असंख्य जीव तळमळताना दिसले. त्यावेळी व्हर्जिन मेरी तिथे साक्षात आली आणि थ्रेसियांना म्हणाली होती, “तुला यांचे दुःख समजते का? त्यांचे दुःख तू अनुभव कर. तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर.” त्यानंतर थ्रेसिया यांच्या धर्मपित्याला म्हणजे फादर जोसेफ विथायाथिलला प्रत्यक्ष व्हर्जिन मेरीने सांगितले की, “तू या मुलीला माझे नाव दे.” त्यामुळे मग थ्रेसियाच्या नावापुढेमरियमउपाधी लागली. तर असे थ्रेसिया यांचे आयुष्य फुल ऑफ मिरॅकल! मृत्यूनंतर थ्रेसियांच्या नावाने थ्रिसूर कोची केरळमध्ये प्रार्थनास्थळ बांधले गेले. तिथे काही काही लोक प्रार्थना करायला जाऊ लागले आणि एकाने अनुभव सांगितले की, “मी अमुक अमुक आजाराने खूप त्रासलेलो होतो. मरियम थ्रेसियाच्या प्रार्थनास्थळावर आलो. थ्रेसियाने मला दृष्टांत दिला आणि मी बरा झालो.” मृत पावल्यानंतर थ्रेसिया यांनी  जादू केली होती. त्यानंतर काही वर्षांनी दुसर्या एका माणसानेदेखील असाच अनुभव वर्णन केला. योगायोगाने दोघेही ख्रिश्चनच होते. आता दोन चमत्कार मृत थ्रेसियांच्या नावावर होते.


मग काय, कॅथलिक चर्चच्या संस्कृतीनुसार ‘संत’ उपाधी दिली नाही तरच नवल. आता इथे कुणी असे विचारू नका की, थ्रेसिया यांनी सैतानाशी युद्ध कसे केले? येशूने त्यांना आपल्या पाच जखमांचा आभास कसा दिला? त्या जखमा त्यांना आणि त्यांच्या धर्मपित्यालाच कशा दिसल्या? बरं, व्हर्जिन मेरीने त्यांना नरकयातना भोगणारी माणसं कुठे दाखवली? ती थ्रेसियालाच कशी दिसली? थ्रेसिया यांनी हे सारे आपल्या दैनंदिन डायरीत लिहून ठेवले. मग श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या परिमाणांत थ्रेसिया यांचे अनुभव कशात मोजायचे? यावर कुणीही काहीही बोलताना दिसत नाही. पोपने थ्रेसियाला ‘संत’पद बहाल केले आहे. रोमन कॅथलिक संस्कृतीनुसार पोप ‘संत’ उपाधी देत नाहीत, तर देवच ती उपाधी बनवून पाठवतो. त्यामुळे एकदा पोपने कुणाला ‘संतत्व’ बहाल केले की, त्याला त्या संतत्वाबद्दल जाब विचारायचा प्रश्नच उद्भवत नाही. ही ‘संत’ उपाधी देण्याच्या परंपरेचा मागोवा घेतला तर जाणवते की, अत्यंत पापी आणि नीच माणसांनाही पोपने संतत्व बहाल केले(म्हणजे देवाने). यामध्ये संत व्लादिमीरचे नाव चटकन आठवते. व्लादिमीरने स्वतःच्या मोठ्या भावाचा खून केला आणि किव्ह साम्राज्याचा तो राजकुमार झाला. त्याचवेळी त्याने त्या मृत भावाच्या मेहुणीवर बलात्कार केला आणि तिला त्याच्या हराममध्ये ठेवले. त्या हराममध्ये शेकडो स्त्रिया आधीच लैंगिक दासी म्हणून गुलाम होत्या. पुढे एका मुलीसाठी व्लादिमीरने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. किव्ह साम्राज्यात परत आल्यावर त्याने अत्यंत तीव्रतेने ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला, साम्राज्याला ख्रिश्चन धर्माचे रूप दिले, तर या व्लादिमीरलाही पुढे पोपने ‘संत’ पदवी दिली. व्लादिमीर ‘संत’ झाला.

 
संत मारिया गोरेट्टी यांनाही पोपने ‘संतत्व’ बहाल केले. कारण, 19व्या शतकाच्या सुरुवातीला 11 वर्षाच्या मारियावर अलसॅन्ड्रो नावाच्या 20 वर्षांच्या नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला. तिने निकराने विरोध करताच, अलसॅन्ड्रोने तिच्यावर चाकूने 14 वार केले. तिला इस्पितळात नेले जाते. तिच्या उशा पायथ्याशी फादर येशू दयाक्षमा शांतीची गाथा गातात. ती मरताना म्हणते,“अलसॅन्ड्रोला मी माफ केले. त्यालाही त्याच्या मृत्यूनंतर माझ्यासोबत स्वर्गात पाहायची इच्छा आहे.” इथे अलसॅन्ड्रोला कारावास होतो. पण पुढे सुटल्यावर त्याला पश्चात्ताप होतो. तो ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करतो. मारियाला त्यासाठी ‘संत’ उपाधी मिळते. यामध्ये मारियाचे ‘संतत्व’ काय? मारियामुळे पश्चात्ताप होऊन एक जण ख्रिश्चन धर्म प्रसार करायला लागला हेच का? या पार्श्वभूमीवर थ्रेसिया यांचे ‘संतत्व’ पाहताना जाणवते की, जिवंत असताना थ्रेसिया यांनी येशूचा मंत्र देत 55 युवतींना ‘सिस्टर’ बनवले होते. ख्रिश्चन धर्माचा प्रचार- प्रसार करत दोन शाळा, दोन वसतिगृह, एक अनाथाश्रम, एक अभ्यासिका बांधली होती. मृत्यूनंतर काही वर्षांत हीच संख्या जगभर 170 वास्तूंमध्ये वाढली. तसेच थ्रेसियाच्या जीवनाने प्रभावित होऊन दोन हजार मुली नन बनल्या. भारतासारख्या हिंदूबहुल देशामध्ये मरियम थ्रेसियाचे ख्रिश्चन धर्म जागरणाचे कर्तृत्व पोपसाठी संतत्वच ठरु शकते...!
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@