साहो’ मधील 'सायको सैया' या पहिल्या गाण्याचा टीजर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2019
Total Views |



'साहो' या भारतातील आगामी ऍक्शन थ्रिलर चित्रपटाविषयी सर्वत्र चर्चा असताना या चित्रपटातील पहिल्याच 'सायको सैया' या गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. 'सायको सैया' हे गाणे ध्वनी भानुशली यांनी गायले असून तिनिष्क बागची यांनी लिहिले आहे. हा एक बहुभाषिक चित्रपट आहे. टॉलिवूड चित्रपटांमधील स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिका साकारत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुजिथ यांनी लिहिली आहे.

गुलशन कुमार आणि भूषण कुमार टी-सीरीज यांनी संयुक्तपणे आणि यूव्ही क्रिएशन्सच्या मदतीने या बिग बजेट चित्रपटाची निर्मती करण्यात येणार आहे. बहुचर्चित अशा 'साहो' मध्ये जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, वेनेला किशोर, मुरली शर्मा, अरुण विजय, प्रकाश बेलवाडी, एव्हलिन शर्मा, सुप्रतेथ, लाल, चंकी पांडे, मंडी बेदी, महेश मांजरेकर, टिनू आनंद यांचा समावेश आहे. 'साहो' एकाच वेळी हिंदी, तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'साहो' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बरोबरीने 'मिशन मंगल' हा चित्रपट देखील त्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@