मुंबई-पुणे 'शिवनेरी' प्रवास झाला स्वस्त, तिकिटांमध्ये भरगोस कपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019
Total Views |



दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू

 

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून, म्हणजे ८ जुलैपासून लागू होणार आहेत.

 

सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठित बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही प्रतिष्ठित सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.

 

शिवनेरीचे नवीन तिकीट दर


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@