एनएमआरडीएच्या बैठकीत १५२९ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019
Total Views |


 


प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या ऑनलाईन सोडतीद्वारे विक्रीस मुख्यमंत्र्यांची मान्यता 

 

मुंबई : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) पाचवी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या १५२९ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
 
 

एनएमआरडीए क्षेत्रातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४३२५ घरकुलांची निर्मिती(४२२ कोटी), कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखडा (२२१ कोटी), ताजबाग दर्गा विकास आराखडा(१३२ कोटी), पोलीस गृहनिर्माण प्रकल्प (१४५ कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर (११४ कोटी), दीक्षा भूमी विकास (१०९ कोटी), फुटाळा तलाव संगीत कारंजे (१०० कोटी) आदी १३०० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यासह अन्य विकास कामांसाठी अनुमानित १५२९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

 

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे करण्यासाठी घरकुल वाटपाकरिता आरक्षण धोरणास यावेळी मान्यता देण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती ११ टक्के, अनुसूचित जमाती ६ टक्के, दिव्यांग ५ टक्के, नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी २ टक्के आणि राज्य शासकीय/निमशासकीय कर्मचारी ५ टक्के असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरक्षित घटकातील घरकुलास पात्र लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ही घरकुले सर्वसाधारण गटात सोडतीद्वारे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@