“माझे आई बाबा माझ्यासाठी ओझं नाही” - रुपाली भोसले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2019
Total Views |



मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले सदस्य त्यांच्यासोबत आतमध्ये अनेक किस्से, अनेक अनुभव, अनेक आठवणी घेऊन येतात. या १०० दिवसांमध्ये सदस्य आपला प्रवास, आपलं बाहेरच जग, घरची मंडळी त्यांच्यबद्दलच्या गोष्टी दुसऱ्या सदस्यांबरोबर शेअर करतात. रुपालीने देखील तिच्या आयुष्यातले किस्से, तिला आलेला तिच्या संसारात आलेला अनुभव सुरेखाताईना सांगताना दिसली.

ज्या माणसाला माझे आई बाबा ओझे वाटणार नाही त्या माणसासोबत आयुष्य काढायला मला आवडेल. आई वडील माझी जबाबदारी आहेत माझ्यासाठी ओझे नाहीये. मी माझ्या भावावर देखील यासाठी अवलंबून नाही असे तिने स्पष्ट केले. लग्न करून एकदा पाहिलं. मी लंडनला होते. खूप वाईट अनुभव आले. तुम्ही माझ्यासोबत या घरामध्ये महिना आहात. तुम्ही बघितल मी स्वयंपाक उत्तम करते, काळजी घेऊ शकते मग मी माझ घर नाही का सांभाळू शकणार ? आणि आता पुन्हा सगळ नको वाटत. मी माझ्या मैत्रिणीना देखील बघितल या सगळ्यामधून जाताना बघितले आहे. लग्नानंतर मी माझ चालू करिअर सोडून लंडनला गेले होते. मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडायला वर्ष लागली त्यामुळे पुन्हा तो अनुभव नको अस वाटत. आता तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे परत त्या गोष्टीवर घालवायला. हा सगळा प्रसंग बिग बॉस मराठीच्या घरात घडल्यावर सुरेखाताईनी देखील यावर तिला आधार दिला.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@