एनसीपीए सादर करत आहे ‘डान्स मी टू द एंड ऑफ लव्ह’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |



मुंबई
: एनसीपीएतर्फे प्लेपेन परफॉर्मिंग आर्ट्स ट्रस्टच्या सहकार्याने २८ जुलै २०१९ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए)च्या एक्स्पेरिमेंटल थिएटरमध्येडान्स मी टू एंड ऑफ लव्हहे नाटक सादर होणार आहे. महेश दत्तानी दिग्दर्शित आणि महेश दत्तानी अवंतिका शंकर लिखित या नाटकात सुखिता अय्यर, आशिष जेशी, दीपल जोशी आणि हिमांशू तलरेजा आणि इतर अनेक कसलेल्या कलाकारांचा अभिनय पाहता येणार आहे.


तुम्ही कधी ठरवून ब्लाइंड डेटवर गेला आहात का? ती पहिली, धमाल डेट पुन्हा कधी अनुभवलीत का? ‘निषिद्धप्रेमाला नाकारल्यानंतर त्याच प्रेमाचा अनुभव सामाजिक भेटीगाठी किंवा मित्रमंडळींसोबत आला, असे कधी झाले का? कदाचित यातले काहीच झालेले नाही. पण, तसे झाले असेल तर तुम्ही अगदी उत्तम गुणांनी पास झाला आहात. आपल्या रहस्ममय धरेवर प्रत्येकानेच कधी ना कधी ती जादू अनुभवलेली असते, तो वेडेपणा केलेला असतो, आपण ज्याला प्रेम म्हणतो ती उत्कट अनुभूती घेतलेली असतेआणि बऱ्याचदा हे घडते अनपेक्षित प्रकाराने.


डान्स मी टू एंड ऑफ लव्हम्हणजे एखादी जुनी कविताअवंतिका शंकर यांच्या डेट अँड डेटेडया आगळ्या वेगळ्या कॅफेची सैर तुम्हाला घडते. शिवाय, महेश दत्तानी यांनी रीडिंगया डॉट-कॉम-रॉममध्ये तुम्हाला सायबर स्पेस आणि वाचनाच्या जगात जाता येईल. यात नेमक्या कोणत्या बाजूला राहून् तुम्हाला दिलखुलास नाचायचे आहे, हे तुम्ही ठरवा. पण, अखेरीस तुम्हाला त्या एका खास व्यक्तीची प्रतिक्षा असते जिच्यासोबत तुम्ही तुमचे गाणे गाऊ शकाल. मग, सुरात नसलात तरी बेहत्तर!


कार्यक्रम : डान्स मी टू एंड ऑफ लव्ह

तारीख : रविवार २८ जुलै २०१९, सायं. .००

स्थळ : गोदरेज डान्स थिएटर, एनसीपीए


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@