चेक बाउन्स झाल्याप्रकरणी कोयना मित्राला ६ महिन्यांची शिक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |



चेक बाउन्स झाल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्री कोयना मित्रा हिला काल ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. अभिनेत्री पूनम सेठी कडून २०१३ सालची तब्बल २२ लाख रुपयांची उधारी चुकवताना चेक बाउन्स झाल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम सेठीने कोयना मित्रा विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने दोघींचीही बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर हा निर्णय काल जाहीर केला.


या निर्णयाला विरोध करत पूनम कडून पैसे घेतलेच नसल्याच्या वल्गना कोयना ने केल्या. आणि उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, पूनम सेठीची एवढे पैसे उधार देण्याची क्षमताच नसल्याचे देखील कोयनाने म्हटले आहे त्यामुळे तिच्याकडे कोणते पैसे मागितले नसल्याचे स्पष्टीकरण कोयना कडून देण्यात येत आहे.


आता याप्रकरणी सत्र न्यायालयाने यावर निर्णय दिला असला तरी उच्च न्यायालय याप्रकरणी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@