स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019
Total Views |



बॉलीवूड
अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्याबाबाचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर नाटक, सिनेमा आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील गुरु म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकरबाबाया चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. स्पृहा जोशी हीपल्लवीआणि अभिजीत खांडकेकर हाराजननावाची व्यक्तिरेखा साकारत असून या चित्रपटात दोघेजण नवरा बायकोची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील अभिजीत आणि स्पृहा या दोघांनी एकत्र केलेले काम आणि त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे. ‘भावनेला भाषा नसते’, असा संदेश देणाराबाबाहा चित्रपट ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.


बाबामध्येतनु वेडस मनूआणिहिंदी मिडीयमफेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनीधागाया झी ५ वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे.


एका ऐकू आणि बोलू शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे. पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात. त्यातून पुढे काय होते, बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो कि त्याला हार मानावी लागते, हे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@