नॉट माय दीपिका हॅशटॅग नेमका कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2019
Total Views |



दीपिका
पादुकोण आणि रणबीर कपूर यांना लव्ह राजन यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना पाहिल्यामुळे दीपिका त्याच्याबरोबर एका नवीन चित्रपटावर काम करणार का अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. ही चर्चा दीपिकाच्या चाहत्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी नॉट माय दीपिका हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरु केला जो अजूनही ट्रेंडिंग आहे.


हा हॅशटॅग सुरु करण्यामागे काय कारण आहे?

लव्ह राजन यापूर्वी Me Too प्रकरणात दोषी आढल्यामुळे अशा माणसाबरोबर दीपिकासारख्या चांगल्या अभिनेत्रीने काम करू नये अशी इच्छा तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. दीपिका अतिशय जबाबदार आणि उच्च दर्जाची कलाकार असल्यामुळे तिने अशा लोकांबरोबर काम करू नये, काही चाहत्यांनी तर दीपिकाला चक्क तिची तत्व आणि नैतिकता याची देखील आठवण करून दिली जेणेकरून तिने या चित्रपटाला नकार द्यावा.


दीपिका आणि तिच्या फॅन्समध्ये एक अतूट नाते आहे. तिच्या चाहत्यांचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे हे या हॅशटॅगवरून दिसून आले. सध्या दीपिकाने तिच्या 'छपाक' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून ती '८३' या तिच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@