'द लायन किंग' ची पहिल्याच दिवशी १३ कोटींची कमाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2019
Total Views |

 

 
मुंबई : द जंगल बुकची लाइव्ह अ‍ॅनिमेशन आवृत्ती जगभर लोकप्रिय झाल्यानंतर डिस्ने आणि दिग्दर्शक जॉन फेवरु यांनी १९९४ च्या 'द लायन किंगया चित्रपटाचा लाइव्ह अ‍ॅनिमेशन अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे. द लायन किंगने शुक्रवारी पहिल्याच दिवशी १३.१७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ट्रेंड अनॅलिस्ट तरण दर्ष याने आपल्या ट्विटर वरून या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी दिली. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने द जंगल बुकलाही मागे टाकलं आहे.
 
 
 
 

 

१९९४ साली द लायन किंगहा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित झाला होता. आता ज्या पिढीने तो अ‍ॅनिमेशनपट पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी लाइव्ह अ‍ॅनिमेशन अवतारात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात चांगली कमाई केली आहे. भारतातील २१४० स्क्रिन्सवर हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी चित्रपटासाठी शाहरुख खान व त्याचा मुलगा आर्यन खानने आवाज दिला आहे. हॉलिवूडचा हा आठवा चित्रपट आहे, ज्याने भारतात पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@