'गर्लफ्रेंड' चित्रपटातील स्पॅनिश गाणे २२ जुलै ला प्रदर्शित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2019
Total Views |



उपेंद्र सिधये दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' चित्रपटातील एक कोरे करकरीत गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या गाण्याने पार भारताच्या पण सीमा पार केल्या असून स्पॅनिश मधले हे गाणे शाल्मली आणि जसराज जोशी यांनी गायले आहे. 'केरीदा-केरीदो' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याचा टीजर सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केला


'केरीदा-केरीदो' या गाण्याचा अर्थ जरी आपल्याला स्पष्टपणे काळाला नाही तरी एक फ्रेश आणि पेपी असे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच एका नाव अनुभव देईल असे आहे. टीजरमध्ये गाण्याच्या रेकॉर्डिंग होतानाची मजा मस्ती आणि त्याच्याच जोडीला गाण्याची छोटीशी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणारे.


 

'गर्लफ्रेंड' चित्रपटातील 'नच्या गॉट गर्लफ्रेंड', 'लव्ह स्टोरी' आणि 'कोडे, सोपे थोडे' अशी तीन गाणी आत्तापर्यंत प्रदर्शित झाली. तर आता 'केरीदा-केरीदो' हे पूर्ण गाणे २२ जुलै ला प्रकाशित करण्यात येणार आहे.



 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@