'स्माईल प्लिज' च्या अँथमचा टीजर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019
Total Views |



मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्माईल प्लिज' या चित्रपटाच्या अँथमचा टीजर आज प्रदर्शित झाला. या अँथम सॉंगमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांचा सहभाग आहे. 'चल पुढे' असे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, दिग्दर्शक विक्रम फडणीस तसेच प्रसाद ओक हे कलाकार दिसणार आहेत.

'चल पुढे' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन रोहन रोहन यांनी केले असून मंदार चोळकर यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यासह बेला शेंडे, मुग्धा कऱ्हाडे, रोहन प्रधान, सचिन पिळगावकर तसेच ग्वेन डीआस यांनी हे गाणे गायल्यामुळे गण्याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या गाण्याचा टीजर आज प्रदर्शित झाला असून लवकरच पूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेता सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या 'हृदयांतर' चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या विक्रम फडणीस यांचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'स्माईल प्लिज' या त्यांच्या आगामी चित्रपटात देखील मुक्ता बर्वे मुख्य भूमिका साकारणार असून आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर देखील या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर, वेदश्री महाजन हे देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून येतील असा हा 'स्माईल प्लिज' चित्रपट १९ जुलैला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@