वाचा...रोहीत शर्माचाबद्दल अनोखा योगायोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019
Total Views |



बर्मिंगहॅम : भारताचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने आयसीसी विश्वचषकात आपले चौथे शतक ठोकत अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. तसेच भारताकडून विश्वचषक सामन्यांत सर्वात जास्त करणारा तो खेळाडू ठरला आहे. एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्यात त्याने संघकाराशी विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतातर्फे विश्वचषकात सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्यांमध्ये सौरभ गांगुलीच्या नावे तीन शकतांचा विक्रम होता. रोहीतने आता चौथे शतक ठोकले आहे.



रोहीतच्या तुफान फटकेबाजीसमोर बाग्लादेशच्या खेळाडूंचा धुव्वा उडाला. ९० चेंडूंमध्ये रोहीतने ही कामगिरी पूर्ण केली आहे. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे २६ वे शतक आहे. विश्वचषकातील सामन्यांत दक्षिण आफ्रीकेविरोधात नाबाद १२२ धावा, पाकिस्तान विरोधात १४० धावा, इंग्लंड विरोधात १०२ धावा तर, आज बांग्लादेशविरोधात ९२ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने सात चौकार आणि पाच षटकार लगावले.



 

अनोखा योगायोग

रोहीत शर्माबद्दल या विश्वचषक सामन्यात अनोखा योगायोग घडला आहे. रोहीत शर्माचा झेल सोडणाऱ्या प्रत्येक संघाविरोधात त्याने मोठी खेळी केली आहे. रोहीतला जीवनदान देणे हे त्यांना महाग पडले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@