मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019
Total Views |


 

मुंबई : पावसाच्या जोरदार बॅटींगनंतर मुंबईची 'तुंबई' होऊ नये यासाठी राज्य सरकारतर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व नाल्यांचे रुंदीकरण करून त्यावर बांधण्यात आलेल्या बेकायदा झोपड्या हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. तसेच मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशी केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मालाड पिंपरीपाड्यातील स्थलांतरांना विरोध करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

गेले पाच दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून विधीमंडळात मंगळवारी विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावर विरोधीपक्षांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांना नाल्याशेजारील झोपडपट्ट्या हटवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. मुंबईतील नाल्यांवर निर्माण झालेल्या झोपडपट्ट्यांची समस्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार दर पावसाळ्यात पाहायला मिळतात. नालेसफाईचाही फारसा परिणाम त्यावर होत नाही, परिणामी मुबईकरांना दरवर्षी अडचणींचा सामना करावा लागतो.

 

नद्या, नाले परिसरात बेकायदा बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळेच मुंबईत पाणी साचते. मुंबईतील काही ठिकाणी बेकायदा बांधकामासाठी नद्यांचे प्रवाह बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढे नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मालाड दुर्घटनेबद्दल बोलताना पालिकेने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@