मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील पूरस्थितीचा आढावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019
Total Views |



मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईसह राज्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. हवामान विभागातर्फे देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य सरकारने मंगळवारी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 



 

 
 
 

गेल्या १२ ते १४ तासांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाण्यातही कोसळधार कायम असल्याने प्रशासनाने हा जाहीर केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या ठिकठिकाणच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.



 

 

मुंबईसह ठाणे,कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.त्यामुळे खबरदारीचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज (मंगळवार,दि.२ रोजी)सर्व शाळा, महाविद्यालयात, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहतील,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठातर्फेही सर्व संलग्न महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहीती कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी दिली आहे.



 

 

मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर सेवा पूर्ववत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला दिले आहेत. मुंबईकरांच्या तक्रारींचे निर्मूलन वेळोवेळी करत राहण्याचे निर्देश संबंधित प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यकता असल्याच घराबाहेर पडा, अशी सूचना प्रशासनाकडून केली जात आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@