मुंबईवर आस्मानी संकट : मालाडमधील मृतांचा आकडा १९ वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019
Total Views |




मालाड : मालाडमध्ये पिंपरीपाडा भागात झोपड्यांवर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १९ जण ठार झाले आहेत. जखमींचा आकडा ५० वर पोहोचला आहे. इतर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केली आहे. मंत्री योगेश सागरही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढीगाऱ्या खाली किती जण दबले आहेत, याचा नेमका आकडा अजून कळलेला नाही. 



 

 

दरम्यान या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून बचावकार्यात पावसामुळे अडथळे येत आहेत. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.



 

 

दुर्दैवाची बाब म्हणजे एक महिला तिच्या बाळासह ढिगाऱ्याखाली आढळली. तिला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@