एनसीपीए मध्ये नाद निनाद – विलायत खान यांच्या कलेचे सुश्राव्य सत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |



नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) या कला संघटनेतर्फे नाद निनादविलायत खान यांच्या कलेचे सुश्राव्य सत्र हा कार्यक्रम २८ जुलै २०१९ रोजी एनसीपीएच्या एक्सपेरीमेन्टल थिएटरवर सादर करण्यात येणार आहे. विलायत खान यांचे सुपूत्र शुजात खान यांनी हे सत्र सादर केले असून या दहा सत्रांच्या मालिकेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर प्रसिद्ध असलेले तबलानवाज झाकिर हुसेन यांच्यातर्फे होणार आहे.


ही सत्रे अरविंद पारीख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार असून विलायत खान यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद यांनी अनेक वर्षे प्रशिक्षण घेतले आहे. सहा दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या या नात्याचाच परिपाक इटावा इमदादखानी घराण्याच्या कलाकृतींमध्ये दिसून आला आहे.


हिंदुस्थानी शास्त्रीय संगितावर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिकांना एनसीपीएच्या जुन्या रेकॉर्डिंग्सचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ सतारवादक विलायत खान (१९२७-२००४) यांची अत्यंत दुर्मिळ रेकॉर्डिंग्स या मालिकेतील सत्रांमध्ये संग्रहित करण्यात आली असून १९७६ ते १९७९ सालच्या एनसीपीएच्या आर्काईव्ह रेकॉर्डिंग्समध्ये यांचा संग्रह आहे. सात पिढ्यांची त्यांची परंपरा पहिल्या सत्रात सादर करण्यात येणार असून यावेळी इमदाद खान (१८४८-१९२०) यांच्या कलाकृतींचा आस्वाद रसिकांना खुद्द विलायत खान यांच्या स्वरांतून घेता येणार आहे.


विलायत खान यांचा जन्म गौरीपूर (आता बांग्लादेशात सामील) येथील संगीतज्ञ घराण्यात झाला. त्यांचे आजोबा इमदाद खान आणि वडील इनायत खान हे त्या काळातील प्रसिद्ध सूरबहार लोकप्रिय सतार वादक होते. बालकलाकार म्हणून विलायत खान यांनी २० व्या शतकात आपल्या वादनाने अनेक श्रोत्यांची मने जिंकून घेतली. त्यांच्या अद्वितीय गायकी अंगामुळे सतारही गाऊ लागली आणि त्यांचा वादन लहेजा आज अनेकजण पुढे चालू ठेवत आहेत.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@