'गेम ऑफ थ्रोन्स' कलाकारांचे स्व सहभागातून ऍमी नॉमिनेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |

 



'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील प्रसिद्ध कलाकारांनी ऍमी पुरस्कारांसाठी स्व सहभागाने स्वतःच्या नावाची नोंदणी केली असून त्यांना नॉमिनेशन देखील मिळाले आहे. एचबीओ ही गेम ऑफ थ्रोन्सची अधिकृत प्रसारण संस्था असून त्यांनी 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील कलाकाराचे नाव ऍमी पुरस्कारासाठी सुचवले नसल्याने स्वतः कलाकारांनी हा निर्णय घेतला.



गेम ऑफ थ्रोन्स मालिकेतील ग्वेनडोलीन क्रिस्टी, एल्फि एलन, कर्सी व्हॅन ह्युटेन या सुप्रसिद्ध कलाकारांनी ऍमी पुरस्कारासाठी त्यांची नावे विचारात घ्यावीत यासाठी स्वतःच त्यांच्या नावांची नोंद केली आणि आश्चर्य म्हणजे त्यांना नॉमिनेशन देखील मिळाले.



'गेम ऑफ थ्रोन्स' या सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले. मालिकांच्या या सीरिजच्या यशस्वी प्रवासामागे कित्येक कलाकार, तंत्रज्ञ यांचे महत्वाचे योगदान आहे. दरम्यान सगळीकडे बहुप्रतिष्टित अशा ऍमी पुरस्कारांविषयी चर्चा सुरु असताना 'गेम ऑफ थ्रोन्समधील एका तरी कलाकाराला हा पुरस्कार मिळावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेलच. मात्र 'गेम ऑफ थ्रोन्स' ची अधिकृत प्रसारण संस्था म्हणजेच एचबीओ ने या सीरिजमधील कोणाच्याच नावाची शिफारस ऍमी पुरस्कारांसाठी केली नाही. त्यांनी असे का केले असावे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असला तरी कलाकारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेच्या कलाकारांना मिळालेल्या नॉमिनेशनमुळे चाहत्यांना आनंद होईल हे निश्चित.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@