बहुचर्चित 'मिशन मंगल' चा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2019
Total Views |

 
 
नवी दिल्ली : येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मिशन मंगल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवरून या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर शेअर केला. अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, किर्ती कुल्हरी आणि नित्या मेनन अशी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या अंतरिक्ष यात्रेचा यशस्वी प्रवास दाखवण्यात आला आहे.
 
 

जगन शक्ती यांनी मिशन मंगलदिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. अक्षय चित्रपटात राकेश धवन ही व्यक्तीरेखा साकारत असून तो या मिशनचा प्रमुख आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर ४५ सेकंदाचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातून अंतरिक्ष यात्रेचा यशस्वी प्रवास दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटातुन भारतीय अंतराळ संशोधन संघटनेत कार्यरत महिला शास्त्रज्ञांच्या कथा आहेत, ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच भारतीय अंतराळ संशोधन संघटनेत वचनबद्ध आहे. 'मंगल मिशन' हा पहिला भारतीय अंतरिक्ष मोहिमे विषयक चित्रपट आहे.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@