सावरकरांमुळे आजारातून बाहेर पडलो - शरद पोंक्षे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |


 

 
मुंबईः सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा नाटकाच्या तालमीसाठी सज्ज झाले आहेत. हिमालयाची सावलीया नाटकातून ते पुनरागमन करत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी ते म्हणाले, ‘माणूस आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरून जात असतो आणि काही संकटं अचानक येतात. तसंच डिसेंबरमध्ये मला अचानक बरं वाटेनासं झालं आणि कर्करोगाचं निदान झालं. मला त्या गोष्टीची प्रसिद्धी नको होती. म्हणून मी कुठेही सोशल मीडियावर फोटो टाकला नाही. मला खोटी सहानुभूती नको होती. पण आता सांगायला काही हरकत नाही कारण मी ती लढाई जिंकलोय.शरद पोंक्षे तालमीसाठी आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले.
 

दरम्यान, आजारातून बाहेर पडण्यासाठी मला सावरकारांची मदत झाली असेही ते म्हणाले. 'सावरकरांनी अकरा वर्ष एका छोट्याश्या खोलीत काढली आणि मला फक्त तीन महिने काढायचे होते. मी सावरकर भक्त आहे आणि याचा मला खुप फायदा झाला. खुप पुस्तकं वाचली, राजेश देशपांडेंनी दिलेलं 'हिमालयाची सावली' हे नाटकं वाचून काढलं. विशेष म्हणजे मी या नाटकात काम करावं यासाठी राजेश आणि नाटकाचे निर्माते मी बरा होईपर्यंत थांबण्यासाठी तयार आहेत हे ऐकून खुप छान वाटलं होतं. असे ते म्हणाले. सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे या आजारातून पूर्णपणे बरे झालो असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालो असल्याचे त्यांनी सांगितलं.

 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...          facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@