इतिहासाचे जतन करणारा तारा निखळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2019
Total Views |


 

 

पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर यांचे दीर्घ आजाराने निधन

 

ठाणे : लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ञ अशी ओळख असणारे पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी वासिंद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून इतिहासाचे जतन करणारा महान तारा आपल्यातून निखळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

डॉ. गोरक्षकर ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याच्या शास्त्राचे तज्ञ म्हणून परिचित होते. धातू मूर्तिकला हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. पूर्व भारतातील कांस्य मूर्तीच्या र्सवकष अशा सर्वेक्षणावर आधारित पुस्तकाच्या लेखनात त्यांचा मोलाचा वाटा होता. यासोबतच त्यांनी डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र, राजभवन्स इन महाराष्ट्र, अनिमल्स इन इंडियन आर्ट, द मॅरिटाइम, हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी, इत्यादी पुस्तकांचे लिखाण केले आहे.

 

अ‍ॅनिमल इन इंडियन आर्ट’, ‘हिस्ट्री ऑफ मेरिटाईम इंडियाअशा प्रदर्शनांची रचना करून जपान, इंग्लंड, मॉरिशस, स्वीडन येथे त्यांनी ही प्रदर्शने भरवण्याचे दिव्या काम पार पाडले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. याठिकाणी इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित झाले आहेत. याच अलौकिक कामाच्या आधारे त्यांना २००३ साली पद्मश्री हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@