फेडरर ऐतिहासिक वाटचालीकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : टेनिस जगतातील सचिन म्हणून ओळख असलेला रॉजर फेडरर हा आणखी एका ऐतिहासिक कामगिरीकडे वाटचाल करत आहे. स्वित्झर्लंडच्या या टेनिसपटूने विम्बल्डनच्या १२व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. कांटे कि टक्कर मानल्या जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालविरुद्ध लढतीमध्ये फेडररने ४ सेटमध्ये पराभव केला. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत १२ वेळा प्रवेश करण्याचा विक्रम फेडररने नोंदवला आहे. तसेच, ८ वेळा विम्बल्डन जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

 

सलग ३ तास चाललेल्या या लढतीमध्ये फेडररने ७-६, १-६, ६-3, ६-४ असा विजय मिळवला. या विजयासह फेडररने फ्रेंच ओपनमधल्या पराभवाचा वचपा काढला. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर रविवारी विजेतेपदासाठी फेडरर आणि सर्बियाच्या नोव्हाक ज्योकोविच यांच्यामध्ये लढत होणार आहे. जोकोव्हिचने उपांत्य फेरीत रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचने ही स्पर्धा जिंकली तर त्याच्यासाठी हे पाचवे विजेतेपद असणार आहे.

 
 
 

२००३ पासून २००९ पर्यंत सलग ७ वर्ष फेडररने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यानंतर २०१२, २०१४, २०१५, २०१७ आणि आता २०१९ असे सलग तो विम्बल्डनची अंतिम फेरी गाठत आहे. त्यापैकी ८ वेळा त्याने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले आहे. विम्बल्डन ओपनमधील आठ, ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहा, यूएस ओपनमधील पाच आणि फ्रेंच ओपनमधील एक अशी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे फेडररच्या नावे आहेत. ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत तो ३१ वेळा पोहचला आहे, तर कारकीर्दीमध्ये त्याने तब्बल १५६ वेळा अंतिम फेरीत लढत दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@