म्हाडा देणार मराठी कलाकारांना घरे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019
Total Views |

 

 
मुंबई - मराठी कलाकारांना एमएमआर विभागात घरे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मराठी कलाकारांना हक्काचे घर घेता यावे, म्हणून एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरे दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. म्हाडाच्या या निर्णयाचा मराठी कलाकारांना आणि तंत्रज्ञांना लाभ होणार आहे.
 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेमा आणि टीव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना आता म्हाडामार्फत स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच म्हाडाची घरे उपलब्ध करण्यात येतील. तर मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करण्यात येतील, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले आहे. या योजनेमुळे बँकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे. बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी, कलाकार आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@