महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची यंदाही मराठी माध्यमाकडे पाठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019
Total Views |

 
 
 
मुंबई : अकरावी आणि बारावीत मराठी अवघड जाते म्हणून अनेक विद्यार्थी मराठीकडे पाठ फिरवतात. इतर भाषांची व पर्यायी विषयांची निवड करतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मराठी भाषेकडे दुर्लक्ष्य होते. अकरावीचा अभ्यासक्रम बदलत असताना सर्व द्वितीय भाषांचा अभ्यास, मूल्यमापन व काठिण्य पातळी सामान पातळीवर आणण्यासाठी म्हणून यंदाच्या वर्षी बालभारतीने अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल केला.
 

गुरुवारी अकरावीची पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळे पहायला मिळाले. मराठीला पर्याय असलेल्या इतर विषयांचा अभ्यास तुलनेत सोपा आहे. यात काही परदेशी भाषांचाही समावेश आहे. यामुळे अनेक मराठी माध्यमाचे विद्यार्थीही जास्त गुण मिळावे या उद्देशाने पर्यायी विषयांची निवड करताना दिसतात. यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे.

 

मराठी विषयाची काठिण्य पातळी लक्षात घेता अनेक विद्यार्थी अकरावीत मराठीला पर्यायी विषयाची निवड करतात. यामुळे बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मराठीपेक्षा हिंदी विषयाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याचबरोबर इतर भाषांच्या विद्यार्थी संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. टक्केवारी कमी होत असल्यामुळे मराठी माध्यमाचे विद्यार्थी अकरावीत मराठीऐवजी हिंदी किंवा फ्रेंच यासारख्या विषयांचा पर्याय निवडतात.

 

सन २०१८ मध्ये मुंबई विभागातून मराठी विषयाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९ हजार २९६ इतकी होती, ती २०१९ मध्ये २२७१ ने घटली असून, यंदा १ लाख ७ हजार २५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. याउलट हिंदी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल सात हजारांनी वाढली आहे. यामुळे मराठीकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे समोर येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@