चाईल्ड पोर्नोग्राफीला तडाखा देणारा भारत पहिला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019
Total Views |



देशातील
चाईल्ड पोर्नोग्राफीच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार पुढच्या आठवड्यात लोकसभेमध्ये लैंगिक अपराधांपासून मुलांना संरक्षण देणारा कायदा म्हणजेच पीओसीएसओ कायदा, २०१२ मध्ये सुधारणा करणार आहे. या कायद्यामध्ये पहिल्यांदाच चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. नवीन व्याख्येनुसार, चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे असा कोणताही मजकूर जसे की फोटो, व्हिडीओ, कॉम्पुटर किंवा डिजिटल चित्रे ज्यामध्ये बालकांचे लैंगिक चित्रीकरण करण्यात आले आहे जे त्या बालकाच्या नेहेमीच्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळे आहे. मग ते चित्र मॉर्फ्ड केलेले असो किंवा मॉडिफाय केलेले या सगळ्या प्रकाराला एकत्रितरित्या चाईल्ड पोर्नोग्राफी असे म्हटले जाईल.


महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या कायद्यामधील सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करणार आहेत ज्यामुळे चाईल्ड पोर्नोग्राफीवर खऱ्या अर्थाने वचक बसण्यास मदत होईल. या आधी जानेवारी महिन्यात या विधेयकामध्ये सुधारणा करण्यात आली मात्र या अपराधासाठी फक्त दंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यासाठी कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बदलेल्या कायद्यानुसार आता गुन्हेगाराकडून ५००० रुपये दंड वसूल केला जाणार आहे जो आधी १००० रुपये होता.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@